वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर.? एकमात्र नक्की की, आ.कांदे सर्वाधिक मतदान मिळवून देणार.!

सा.शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
दिंडोरी लोकसभा मतदार संघात एकूण ६२ टक्के इतके मतदान झाले आहे, तर नांदगाव विधानसभा मतदार संघातून ही ५८.०९ इतके मतदान झाल्याने ही वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडणार.? याची चर्चा रंगली आहे. मात्र मित्रपक्ष म्हणून उमेदवाराच्या ही अगोदर प्रचारासाठी प्रारंभ करून जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या आमदार सुहास कांदे यांनी दिलेल्या शब्दानुसार ते डॉ. भारती पवार यांना सर्वाधिक मते मिळवून देतील असे झालेल्या मतदानावरून दिसून येत आहे.
     उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना कांदा प्रश्न, नांदगाव,मनमाड च्या रेल्वे गाड्यांचा प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश, नांदगावच्या जनतेला त्रासदायक ठरलेला भुयारी मार्ग यारून लोकांच्या नाराजीला तोंड द्यावे लागत होते. म्हणूनच त्यांनी प्रथम पासूनच नांदगाव मतदार संघातल्या प्रचार दौऱ्याकडे जणू पाठ फिरवल्याचे दिसून येत होते.
     मित्रपक्षाचे उमेदवार म्हणून या मतदार संघांचे आमदार सुहास कांदे यांनी मात्र डॉ. भारती पवार यांची बाजू चांगलीच लावून धरत लोकसभेचा हा किल्ला एकाकी लढवत आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येत होते. आ. श्री. कांदे यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघातील साडे सहा जिल्हा परिषद गटातील बूथप्रमुख, शिवसेना कार्यकर्ते, नेते, महिला आघाडी, सरपंच, सदस्य, सोसायटी अध्यक्ष,संचालक असे गावातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या लोकांना आग्रहापूर्वक निमंत्रण देऊन एकापाठोपाठ नऊ भव्यदिव्य मेळावे घेतले. आणि मेळाव्यातून त्यांनी डॉ. भारती पवार यांच्या चुकांवर पांघरून घालण्याचा सल्ला देत मी समजून मदत करा असे पोटतिडकीने आवाहन करत राहिले. यात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अंजुम कांदे यांनीही तितकीच मोलाची साथ दिली. त्यांनीही महिलांचा भव्य असा मेळावा घेत डॉ. भारती पवार ह्या माझ्या नणंद आहेत. असे समजून मतदान करा.अशी कळकळीची साद महिला मतदारांना घातल्याचे दिसून आले.
    मनमाड येथील राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभा घेऊन ती पूर्ण ताकदीने यशस्वी करण्याचे सर्व श्रेय आमदार सुहास कांदे व सौ.अंजुम कांदे यांचेच होते. हे कुणी नाकारू शकत नाही. कारण आ. श्री. कांदे यांनी जे मेळावे घेतले त्याकडे राष्ट्रवादी (अजित पवार गट ) काँग्रेस च्या नेते व कार्यकर्त्यांनी जशी पाठव फिरवली तशी खुद्द भाजपच्याच एका गटाने ही स्वतःच्या उमेदवारसाठीचा मेळावा असताना ही या मेळाव्यांना गैरहजेरी दर्शवली.याची चर्चा ही तालुक्यात झाल्याने उद्या भाजप उमेदवाराला दगा फटका झाला तर राष्ट्रवादी सोबत भाजप च्या एका गटाला ही याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
     याउलट आमदार सुहास कांदे यांच्या प्रचाराची दखल घेऊन भाजपचे वरिष्ठ वर्तुळात वावरणारे आमदार श्रीकांत भारतीय यांनी नांदगाव ला भेट देऊन आमदारांच्या निवासस्थानी येत 'सुहास अण्णांमुळे डॉ. भारती पवार यांचा विजय निश्चित असल्याचे गौरवोदगार काढले होते.मात्र विजय होईल की, नाही ते आज जरी सांगता येत नसले तरी आमदार सुहास कांदे यांना मानणाऱ्या या मतदार संघात त्यांची प्रतिष्ठा नक्की जपली जाईल.असे चित्र झालेल्या मतदानावरून व गावागावातील कार्यकर्त्यांच्या चर्चेवरून दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक