देवघट फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खतांच्या कृत्रिम टंचाईवर मात करणे शक्य होणार.! आ. सुहास कांदे. कंपनीला पूर्ण सहकार्य करण्याचे अभिवचन..

सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
नांदगाव विधानसभा मतदार संघातील देवघट येथे देवघट फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चे उदघाट्न आमदार सुहास कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.
     प्रत्येक हंगामात रासायनिक खते, औषधे, बियाणे यासाठी खाजगी व्यापाऱ्यांकडून कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार सातत्याने घडतं असतो. यावर प्रभावी मार्ग  काढण्याच्या उद्देशाने मालेगाव तालुक्यातील देवघट व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी एकत्र येत देवघट फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड या सहकारी तत्वावर कंपनीची शासनाची रीतसर मान्यता घेऊन स्थापना केली आहे. त्याचे उदघाट्न आमदार सुहास कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.
.   या कंपनीकडून शेतकऱ्यांना अत्यल्प नफा घेऊन खते, औषधे, व बियाणे विक्री केली जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना सदर बियाणे, खते याच्या लागवड व वापराबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल ही खरेदी केला जाणार आहे. या कंपनीच्या निर्मितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, या कंपनीला लागेल ते सहकार्य करण्यास मी नेहमी बांधील राहील असे आमदार सुहास कांदे यांनी उदघाट्नानंतर  सांगितले.
.     यावेळी ज्ञानेश्वर कांदे यांच्यासह  चेयरमन रोहित जाधव,सेक्रेटरी शरद पगार,संचालक ज्ञानेश्वर काकळीज,कमलाकर देवरे, निलेश निकम, संदीप अहिरे, अमोल देवरे, मनीषा भामरे, मोठाभाऊ काकळीज, स्वाती जाधव, आदीसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक