तुमच्या कष्टाचा एक रुपया ही बुडू देणार नाही.! आ. सुहास कांदे युनियन बँकेकडून फसवणूक झालेल्या मुदत ठेवीदारांना दिलासा.

सा.शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
युनियन बँक ऑफ इंडिया च्या मनमाड शाखा मध्ये शेकडो ग्राहकांच्या मुदत ठेवीच्या करोडो रुपयांना हडप करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर  आमदार सुहास कांदे यांनी तातडीची बैठक घेऊन ठेवीदारांच्या कष्टाच्या रकमेची संबंधित बँकेकडून वसुली होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. असे सांगितले. व या घटनेच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथकाची निर्मिती केली आहे.
.       युनियन बँकेचे कंत्राटी विमा प्रतिनिधी संदीप देशमुख याने मुदत ठेव ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या खात्यावरील करोडो रुपयांना चुना लावला आहे. सदर प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून, हतबल झालेल्या या ग्राहकांनी आमदार सुहास कांदे यांच्याकडे तक्रार करताच, आमदारांनी मनमाड संपर्क कार्यालयात फसवणूक झालेले ग्राहक व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. व सर्व प्रकार समजून घेत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी बँकेच्या मनमाड शाखेवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना केल्यात.
.        तसेच उपस्थित ठेवीदारांना तुमच्या कष्टाच्या रकमेची अशी उधळण होऊ देणार नाही. तुमच्या पै अन पै चा परतावा  त्यांना द्यावा लागेल असा दिलासा आमदार श्री. कांदे यांनी दिला.
.     यावेळी पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन, पोलीस नितीक्षक अशोक घुगे, माजी आमदार संजय पवार, फरहान खान, बबलू पाटील, मयूर बोरसे,शाईनाथ गिडगे,आदी महत्वाचे नेते उपस्थित होते.
.              यावेळी आ. श्री. कांदे यांनी सदर कर्मचारी संदीप देशमुख ऐवजी संपूर्ण बँकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र बँकेचे प्रबंधक यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत या रकमेची हमी घेत असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांच्याशी बोलताना केला आहे
.     दरम्यान आमदार श्री. कांदे यांनी फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांना तुमच्या जवळ जी काही कागदपत्रे असतील ती संपर्क कार्यालयात जमा करण्याचे आवाहन यावेळी केले. व तुमच्या कष्टाचा एक रुपया ही बुडू देणार नसल्याची हमी दिली. 

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक