कार्यकर्त्यांचे प्रेम हेच माझे टॉनिक -: आ. सुहास कांदे

सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
या सुहास अण्णाचा बाप आमदार, खासदार सोडाच ; पण साधा ग्रामपंचायत चा सदस्य ही नव्हता.मात्र तुम्ही दिलेल्या मतांच्या भिकेमुळे मी आज या मतदार संघाचा आमदार आहे.अन आज ही स्थिती आहे की, माझे पत्र बघताच मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री वर न बघता सही करतात.आणि हे सर्व तुमच्या प्रेम व आशीर्वादामुळे शक्य झाले आहे. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
 न्यायडोंगरी जिल्ह परिषद गटातील शिवसैनिकांचा मेळावा आज अभूतपूर्व गर्दीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शिवाजी बच्छाव होते तर व्यासपीठावर माजी सभापती विलासराव आहेर,राजेंद्र पवार,लभान बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र गांगोले नाईक,बाजार समिती सभापती अर्जुन निकम,उपसभापती दिपक मोरे,बाजार समितीचे संचालक जीवन गरुड,
हिरालाल आव्हाड,भाजपचे दत्तराज छाजेड, सागर फाटे,अँड. किरण गायकवाड,राजेंद्र देशमुख,राजाभाऊ जगताप,महिला आघाडीच्या नेत्या सौ. अंजुम ताई कांदे, सौ. श्रद्धा ताई कुलकर्णी, सौ. उज्वला ताई खाडे,आदी उपस्थित होते.
     या न्यायडोंगरी गटातील गावांमध्ये तीन कोटींपेक्षा जास्त कामे झाली आहेत.आणि मतदार संघातील बहुतांश गावांमध्ये जवळपास हिच स्थिती आहे. त्यामुळे लोक मला म्हणतात की, अण्णा तुमच्या वेळी सोबत राहू.पण महायुतीच्या उमेदवार डॉ.भारतीताई पवार मला सख्या बैहिनीप्रमाणे आहे. त्यामुळे त्यांना सर्वाधिक मताधिक्य देणे एक भाऊ म्हणून माझे कर्तव्य आहे. म्हणून मी आपणास हात जोडून विनंती करतो की, सर्व काही विसरून ताईंना मदत करावी. असेही आ. श्री. कांदे शेवटी म्हणाले.
तर यावेळी माजी सभापती विलासराव आहेर यांनी न्यायडोंगरी जिल्हा परिषद गटात आमदार सुहास अण्णांनी केलेल्या कामांची माहिती देऊन डॉ. भारती ताईंना अण्णा समजून मतदान करावे.व त्यांच्या विजयात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तर महिला नेत्या सौ. अंजुम ताई कांदे,अँड. किरण गायकवाड, सावरगाव चे सरपंच आबासाहेब भुसारे, भाजपचे दत्तराज छाजेड, अशोक जाधव, पिंपरखेड चे राजेंद्र मवाळ, लभान बंजारा समाजाचे अध्यक्ष रवींद्र गांगोले,यांनीही मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास अण्णांच्या विकासकामांची तारीफ करून महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
       यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान दादा खान,किरण कांदे,महिला आघाडीच्या विद्याताई जगताप, संगीताताई बागुल, रोहिणीताई मोरे,सौ.पुजाताई छाजेड,अँड. विद्याताई कसबे, एकनाथ पाटील, रघुनाथ सांगळे, दत्तू सरोदे,गोरख सरोदे, पुंजाराम पथे,प्रमोद भाबड,युवा सेनेचे सागर हिरे, सुनील जाधव, भावराव बागुल, शशी सोनावणे, अय्याज शेख, भैय्या पगार, तेजराज आहेर, प्रकाश शिंदे,आदीसह हजारो शिवसैनिक, महिला आघाडी च्या असंख्य कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
      

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक