तालुक्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी जलतरण तलावांची निर्मिती -: आ. सुहास कांदे
मनमाड - आमदार सुहास कांदे यांनी वैशिष्टपूर्ण योजनेतून सुमारे पाच कोटी निधी मंजूर केलेल्या जलतरण तलावास 'राजमाता जिजाऊ जलतरण तलाव मनमाड.! असे नाव देण्यास मनमाड नगरपरिषदेने मान्यता दिल्याने शिवप्रेमी नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
. शहरातील आयुडीपी (प्रभाग क्र.६) मध्ये तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्टपूर्ण योजनेतून जल
तरण तलाव व सुशोभीकरण साठी सुमारे पाच कोटी निधी मंजूर करून आणला होता. आजमितीस या जलतरण तलावाचे काम अंतिम टप्यात आहे.
सुहास कांदे - आमदार -: जागतिक पातळीचे अत्याधुनिक जलतरण तलाव मनमाड व नांदगाव मध्ये उभारले आहेत. यातून येथील माझ्या तरुण बांधवाना संबंधित स्पर्धेसाठी मदत होऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील अशी अपेक्षा आहे.
या तलावाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आ. श्री. कांदे यांच्याकडे केली होती. त्यास अनुसरून आमदारांनी नगरपरिषदेकडे पत्रव्यवहार करून लोकभावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या असता, नगर परिषदेने नगरपंचायत औद्योगिक अधिनियम १९६५ चे कलम १८५ (अ ) प्रमाणे नगर परिषद हद्दीतील सार्वजनिक रस्त्यास,चौकास, जागेस नावे देण्याच्या तरतुदी नुसार सदर जलतरण तलावास 'राजमाता जिजाऊ जलतरण तलाव मनमाड' असे नाव देण्यास मान्यता देऊन तसा मान्यता आदेश आ. सुहास कांदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
. आ. सुहास कांदे यांच्यासह शहर,तालुक्यातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त करून आभार मानले आहेत.
.
Comments
Post a Comment