पिंप्राळ्याच्या विकासासाठी भरीव मदत करणार -: आ. सुहास कांदे

सा. श नै श्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
संपूर्ण मतदार संघात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत.व हा विकासाचा रथ असाच अविरत धावणार आहे. तुम्ही मागाल ते काम मी तुम्हाला देईल. तुमच्या गावाच्या विकासासाठी कायम सहकार्य केले जाईल. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
.    पिंप्राळा  ग्रामपंचायतीच्या  ठरलेल्या आवर्तनानुसार बाळू तुळशीराम सदगीर यांनी राजीनामा दिल्याने या पदावर सौ. कविता बाळकृष्ण बिन्नर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी करण्यात आला. त्यावेळी आ. कांदे यांनी मनोगत व्यक्त केले. व गावाच्या विकासाविषयी मार्गदर्शन केले.
.     तसेच यावेळी विविध कार्यकारी संस्थेच्या चेयरमन पदी बिरूदेव सोमा आयनोर यांची निवड झाल्याने त्यांचा ही सत्कार आ.कांदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भगवान सातपुते, काळू शिंदे, महादू उशिरे, डॉ. बन्सी सदगीर, छगन सदगीर, साहेबराव कारंडे, कैलास निकम, खंडू कोळेकर, राजाराम गांगुर्डे, भगवान पांढरे, अण्णा सदगीर, भाऊसाहेब ढोणे, वाल्मिक निकम आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक