स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहचली तांबेवाडीत एस्टी.... आ. सुहास कांदे यांच्या प्रयत्नांना यश.!
सा.श नै श्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षाचा कालावधी लोटलाय... दुर्गम भागाचे सोडाच,साध्या सोप्या गावात ही एस्टीचे दर्शन दुर्मिळ असल्याचे दिसून येते. तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीत समावेश असलेल्या तांबेवाडीत आ. सुहास कांदे यांच्या अथक प्रयत्नाने आज राज्य परिवहन मंडळाची बस पोहचल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तर आता तालुक्याच्या गावी शिकायला मिळणार म्हणून विद्यार्थ्यांनी नाचून आनंद साजरा केला.
. तालुक्याच्या शहरापासून अवघ्या १० ते १२ किलोमीटर वर टाकळी गाव आहे. आणि तेथून दोन ते तीन किलोमीटर वर तांबेवाडी नामक छोटे गाव आहे. मेंढपाळ लोकांच्या बहुसंख्येने वास्तव्य असलेल्या या गावात अनेक सुविधा अजून पोहचलेल्या नाहीत. त्यापैकी बस या शासकीय सुविधेचा समावेश होता.मात्र आमदार कांदे यांच्यामुळे या गावात बस पोहचल्याने या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.
. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील जाधव,प्रकाश शिंदे,राजेश शिंदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment