अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे मनमाड च्या नागरिकांचा जीव धोक्यात,उपाययोजना करण्याची शिवसेनेची मागणी.!
मनमाड शहरातून जाणाऱ्या मालेगाव नगर महामार्गांवर (क्रमांक -१०) सद्यस्थितीत अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. निपराध नागरिकांना हकनाक जीवास मुकावे लागत असल्याने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मनमाड शहर शिवसेनेने केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियत्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या अवजड व मोठ्या वाहतुकीसाठी कन्नड व कासारी घाटाचे काम सुरु असल्याने सर्व वाहतूक मनमाड मार्गे वळवण्यात आली आहे. या मार्गांवर ५ मोठ्या शाळा, दोन्ही बाजूने लोकवस्ती, बँका,असल्याने रस्ता ओलांडणे गरजेचे असते. मात्र ह्या वाहनांच्या वर्दीळीने लहान मुले, जेष्ठ नागरिक, महिला अशा सर्वच घटकांचा जीव धोक्यात आला आहे.
. तालुक्याचे आमदार सुहास कांदे ही समस्या कायमची सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून, एकतर बायपास किंवा उड्डाणंपूल यासाठी त्यांचे शासन दरबारी प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे मनमाडला आले असता, आ. श्री. कांदे यांनी त्यांच्याकडे ही हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती.
. जो पर्यंत ठोस निर्णय होत नाही, तो पर्यंत कमीत कमी वेगाने वाहने चालवावीत. या वाहनानी वेग मर्यादा पाळून ओव्हरटेक करू नये, दुरुस्तीचे काम रात्री उशिरा करण्यात यावे, वाहतूक सूचना फलक दर्शनी भागात लावावे, धोकेदायक ठिकाणी हायमास्ट लावण्यात यावे, झेब्रा क्रॉसिंग करण्यात यावी. जेणेकरून नागरिकांना रस्ता ओलांडणे सोपे होईल.अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
. या निवेदनावर शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, नगरसेवक आझाद पठाण, लोकेश साबळे, बाबा पठाण, मन्नू शेख, सागर आव्हाड, मोहसीन पठाण, स्वराज वाघ, बबन फुलवानी, असिफ पठाण आदीच्या सह्या आहेत.
Comments
Post a Comment