पहिली चाचपनी यशस्वी.... दिलेला शब्द खरा करून दाखवला... मतदार संघावर आ. सुहास कांदे यांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध.!

सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक )-: संतोष कांदे 
लोकसभा निवडणुक सुरु झाल्यापासून महाराष्ट्रासह दिंडोरी लोकसभा मतदार संघातही अनेक समस्या वरून भाजपला यंदा समाधानकारक यश मिळणार नाही. यावर शिक्कामोर्तब झाले होते.मात्र नांदगाव मतदार संघातून इतर पाच मतदार संघापेक्षा सर्वाधिक मते मिळवून देईन.असा शब्द इतके विरोधात वातावरण असतानाही आ. सुहास कांदे यांनी महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना देण्याचे धारिष्ट्य दाखवले होते.आणि शब्द खरा ठरल्यानंतर यावरून त्यांची मतदार संघावरील पकड व आपल्याप्रती जनतेचा असलेला विश्वास दिसून आला आहे.डॉ.पवारांच्या पराभवापेक्षा आ. सुहास कांदे यांनी मिळवून दिलेल्या मतधिक्याचीच अधिक चर्चा मतदार संघात झाली आहे. 
     महाआघाडीचा उमेदवार विजयी होऊनही मतदार संघात मिळालेल्या अल्प मतांमुळे नेते व कार्यकर्त्यांना धड विजय ही साजरा करता आला नाही.हे आ. कांदे यांच्या कुशल राजनीतीचे व त्यांनी मेळाव्यांमधून केलेल्या भाषणाचे हे यश म्हणावे लागेल. जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे घेत असताना आ.कांदे यांनी या प्रत्येक भाषणात दरवेळी एक मुद्दा प्रामुख्याने मांडला.तो असा की, भारती ताई विरोधातील नाराजी दाखवण्याच्या नादात तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवरील विरोधकांना आयते बळ मिळवून द्याल.आणि मग सरपंच, सदस्य, नगरसेवक आदी पदापासून तुम्ही स्वतः वंचित व्हाल. आणि हा मुद्दा पटल्यानेच मतदार संघातल्या प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यापेक्षा निश्चितच महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना जास्त मते आहेत.
      नांदगाव मतदार संघात मेळावे घेत असताना राष्ट्रवादी (अजित पवार गट ) प्रामाणिकपणे काम करत नसल्याचे पुराव्यानिशी दाखवून देण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा ही एक कुशल राजनीतीचा भाग होता.कारण नाशिक लोकसभा जागेवरून जे झाले. ते भविष्यात नांदगाव मतदार संघाबाबत होऊ नये, यासाठी त्यांनी पुढची पाऊले ओळखून हा राजकीय डावपेच टाकला होता.तो यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.
     

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक