तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला,पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही.! आ. सुहास कांदे

सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. हा विश्वास कायम ठेवा तुमच्यावर कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
.     साकोरा जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे नेते प्रशांत बोरसे यांच्यासह २००/२५० तरुण कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या व समाजसेविका सौ. अंजुम कांदे यांच्या लोकहिताच्या विकासकामांनी प्रभावित होऊन आज आमदारांच्या निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी आ. श्री. कांदे मार्गदर्शन करत होते.
मला जो आवडतो किंवा ज्याचे काम मला आवडते त्याचे कल्याण मी करतो.किंबहुना त्याचा भविष्यकाळ उज्वल असतो. हे सर्वाना माहित आहे.हवे तर सभापती सतीश बोरसे ना विचारा अशी मिश्किल टिपण्णी आमदार सुहास कांदे यांनी यावेळी केली.
प्रशांत बोरसे यांच्या साकोरा गटातील साकोरा,वेहेळगाव,मंगळणे, भोसलेवाडा, फुलेनगर भागातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आ. कांदेच्या नेतृत्वावर विश्वास टाकत हा प्रवेश करत असल्याचे यावेळी जाहीर केले.
.     येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने आ.सुहास कांदे यांचे नेतृत्व लोकांभिमुख झाल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती सतीश बोरसे, मजूर संघांचे माजी चेयरमन प्रमोद भाबड, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सागर हिरे व प्रवेशकर्ते प्रशांत बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. 
.     आ. श्री. कांदे यांनी प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचा भगवी शाल घालून त्यांचा सत्कार केला. व शुभेच्छा दिल्यात. यावेळी समाजसेविका सौ. अंजुम कांदे,सायखेडा चे सरपंच भाऊसाहेब कातकडे,जिल्हाप्रमुख फरहान खान, शहरप्रमुख रोहिणी मोरे,प्रकाश शिंदे,शरद सोनावणे,आदीसह चंद्रमदास महाराज, सुनील शिरसाठ, दिलीप मोरे, कैलास सोनावणे, वामन जाधव, सोमनाथ पीठे, बापू वाघ, जंगलू गुंबाडे, सुनील मोरे, नाना मोरे, सोमनाथ पवार, संतोष सोनावणे, नाना चव्हाण,दावल गायकवाड, गणेश मोरे, नंदू गुंबाडे, गोविंदा मोरे, चंदू पवार, युवराज पवार, रवी गांगुर्डे, सोनू ठाकरे, विजय सोनावणे, आनंदा राऊत, आदीसह २००/२५० कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक