आजपर्यंत दिलेल्या सर्व शब्दांची पूर्तता -फरहान दादा खान

सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
-:  दीड वर्षांपूर्वी अकरामुखी महादेव मंदिराच्या अखंड हरीनाम सप्ताह निमित्ताने आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मंदिराला भव्य सभामंडप बांधून देण्याचा शब्द दिला होता. आज त्यांच्या या शब्दाची पूर्तता झाली असून, भव्य सभामंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांचा गौरव केला. "सभामंडप भक्तांच्या सेवेत उपलब्ध झाला आहे, तसेच आमदार सुहास अण्णांनी स्वखर्चातून हायमास्ट लाइट्स बसवून दिले आहेत, ज्यामुळे मंदिर परिसर आता अधिक प्रकाशित झाला आहे. येण्या-जाण्यासाठी रस्त्याचे काम ही लवकरच सुरू केले जाणार आहे," असे फरहान दादा खान यांनी यावेळी सांगितले.

सोहळ्याला शहरप्रमुख सुनील जाधव, राजेश शिंदे, कारभारी शिंदे, अंबादास शिंदे, दिगंबर भागवत, भरत इघे, बिरू शिंदे, भगीरथ जेजुरकर, हिंमत शिंदे, बापू शिंदे, गंगाधर कर्नर, कृष्णराव शिंदे, वसंत सोनावणे, भावराव शिंदे, नारायण शिंदे, शशी सोनावणे, संतोष कांदे यांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मल्हार सेनेचे राजेश शिंदे यांनी आ. सुहास कांदे यांच्या मतदार संघात सुरु असलेल्या विविध विकासकामांची माहिती उपस्थित भाविकांसमोर मांडली.

या कार्यक्रमादरम्यान जुना आखाडाचे दिवंगत किसनगिरी महाराज यांच्या ४५ व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन व श्रावण महिन्याच्या पर्व काळाचे औचित्य साधून अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक