आमदार सुहास कांदे बाल मैत्रिणीला गिफ्ट देतात... तेव्हा.!
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (nashik) संतोष कांदे
बाळहट्ट, स्त्रीहट्ट हे नेहमीच पुरवायचे असतात. असे पूर्वापार चालत आलेय.मात्र बाळाने हट्ट करण्याअगोरच त्याला गिफ्ट नातेवाईकांऐवजी अनाहूत पाहुण्याकडून मिळाले तर त्याचा आनंद गगनात मावत नाही. असाच काहीसा प्रकार नांदगाव शहरात एका चिमुकली च्या बाबतीत घडला.
. नांदगाव शहरातील हनुमान नगर मध्ये आमदार सुहास कांदे यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या रोजच्या जाण्या -येण्याच्या मार्गांवर पंकज खैरनार यांचे गोळ्या -बिस्कीटचे दुकान आहे. श्री. खैरनार यांची प्रणवी नावाची तीन चार वर्षाची मुलगी दुकानाच्या काउंटरवर खेळत असताना ज्या -ज्या वेळी आमदार कांदे यांच्या गाड्यांचा ताफा तेथून जातो, तेव्हा ती रोजची ओळख असल्यासारखी त्यांना टाटा -बाय बाय करत असते.
. तीच्या बाय -बाय ला रोज उत्तर देणारे आमदार सुहास कांदे नेहमी ठरवून घ्यायचे की, येताना हिला काहीतरी गिफ्ट आणायचे मात्र कामाच्या दगदगीत विसरून जायचे. काल मात्र त्यांनी ठरवून तिच्यासाठी तिला पसंत पडतील असे भरपूर गिफ्ट आणले. अन गाड्यांचा ताफा त्यांच्या दुकानासमोर थांबवून तिला गिफ्ट दिल्या.तेव्हा प्रणवी च्या निरागस चेहऱ्यावर निख्खळ हसू पसरले होते. व उपस्थित नागरिक व खुद्द आमदारांचे कार्यकर्ते ही अचंबीत झाले होते.
. काही कार्यकर्त्यांनी हे फोटो, व्हिडिओ काढून सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर ते प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.
Comments
Post a Comment