मळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सुवर्णा आहेर यांची तर चेयरमनपदी जिभाऊ देवरे.!
सा.श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (nashik) संतोष कांदे
तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायत व सोसायटीवर आ. सुहास कांदे यांच्या गटाचे वर्चस्व सिद्ध झाले असून, सरपंचपदी सौ. सुवर्णा आहेर यांची तर चेयरमनपदी जिभाऊ देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
मावळते सरपंच सुरेखा आहेर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर सर्व सहमतीने सरपंचपदी सौ. आहेर यांची निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच नितीन आहेर, श्याम आहेर, बारकू दळवी,आवडाबाई गायकवाड,छाया मोरे, प्रवीण दौलत आहेर आदी ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवला.
. यावेळी मळगाव विविध कार्यकारी संस्थेची ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.अध्यक्षपदी जिभाऊ देवरे, यांची तर उपाध्यक्षपदी सरूबाई आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी मावळते अध्यक्ष सौ. विद्या आहेर, उपाध्यक्ष विरभान देवरे, संचालक केशव आहेर, समाधान आहेर, कैलास त्रिभुवन, मुरलीधर आहेर, रघुनाथ देवरे, डॉ. संजय आहेर, अलका आहेर, संदीप आहेर आदीसह ज्ञानदेव आहेर, सर्जेराव आहेर, मुरलीधर आहेर, भाऊसाहेब आहेर, प्रवीण आहेर, कुणाल आहेर, रवींद्र देवरे, प्रकाश आहेर,युवराज आहेर,प्रकाश शिंदे,आदीसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
. सदर नवनियुक्त सरपंच, सोसायटी चेयरमन, व्हा. चेयरमन यांचा आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांनी सत्कार केला.
Comments
Post a Comment