विरोधी पक्षांची अवस्था 'रडकी सवत 'सारखी झालीय -मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे
सा. श नैश्वर टाइम्स. वृत्तसेवा
नांदगाव (nashik ) संतोष कांदे
तुमच्यासाठी सुहास अण्णा जेव्हा - जेव्हा माझ्याकडे आलेत. तेव्हा रिकाम्या हाती कधी गेले नाहीत.प्रत्येक वेळी काही ना काही मतदार संघांसाठी मागत राहिले. आणि मी देत गेलो. मी घेणाऱ्यातला नाही तर देणाऱ्यातला आहे. म्हणून विरोधी पक्षांची अवस्था रडकी सवत सारखी झालीय असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केले.
. नांदगाव मतदार संघांचे आमदार सुहास कांदे यांनी ३६ कोटी रुपये खर्चून सुमारे अडीच एकरात आशिया खंडातील एकमेव अशी शिवसृष्टी उभारली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे हस्ते संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री ना. शिंदे बोलत होते.
. यावेळी व्यासपिठावर नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे, कल्याण लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी आमदार संजय पवार, राजेंद्र देशमुख, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, सौ. अंजुम सुहास कांदे, फरहान खान, ज्ञानेश्वर कांदे, धनंजय कांदे, किरण कांदे, राजेश कवडे आदी उपस्थित होते.
. मुख्यमंत्री ना. शिंदे म्हणाले की, तुमचा आमदार सुहास अण्णा शब्दाला एकदम पक्का आहे. त्यांनी साथ दिली म्हणून मी तुमच्यासाठी काही तरी करू शकलोय. लाडकी बहीण, लाडका भाऊ, अन लाडकी लेक ह्या योजना प्रचंड यशस्वी झाल्यात. त्यामुळे विरोधकांची अवस्था रडकी सवत सारखी झालीय. म्हणून ते लाडकी बहीण योजनेला चुनावी जुमला म्हणत होते. पण आमच्या सरकारने प्रत्येक बैहिनीच्या खात्यावर तीन हजार रुपये तत्काळ टाकून त्यांची तोंडे बंद केली आहेत.व मुलींचे उच्च शिक्षण सर्व मोफत केलेय. एका मुलीने शैक्षणिक फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली म्हणून हा निर्णय रात्री अडीच वाजता घेतला.असेही ते म्हणाले.व कोकणातील ती दुर्घटना घडल्याने मी प्रचंड दुःखी झाल्याचे ही त्यांनी ह्यावेळी भावुक स्वरात सांगितले.
. तर प्रास्ताविक करताना आमदार सुहास कांदे म्हणाले की, साहेबांनी मला कधीही रिकाम्या हाती पाठवले नाही. माझ्या नांदगाव मतदार संघातल्या जनतेसाठी मी जे मागितले त्याच्या दुपट्ट मला दिले. मग त्यात ह्या शिवसृष्टी सह मनमाड करंजवन पाणी योजना, नांदगाव गिरणा धरण स्वतंत्र पाणी योजना, ७८ खेडी पाणी योजना, मनमाड औद्योगिक वसाहत, अशा अनेक योजनाना साहेबांनी भरभरून निधी दिल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.
. यावेळी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनीही मनोगत व्यक्त केले.त्यानंतर मुख्यमंत्री व मान्यवरानी शिवसृष्टी येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुद्ध पुतळ्याचे अनावरण केले.
Comments
Post a Comment