आ. सुहास कांदे यांना 'धर्मरक्षक' पुरस्कार जाहीर.!

सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
   नांदगाव मतदार संघाच्या विकासाचा रथ अविरतपणे सुसाट वेगाने नेण्याचे काम करत असताना जनतेची सामाजिक अस्मिता जोपासून धार्मिक कार्य ही तितक्याच नेटाने पुढे नेत असलेल्या आमदार सुहास कांदे यांना अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने 'धर्मरक्षक ' हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
.      येत्या १९ ऑगस्ट रोजी नांदगाव शहरातील गुप्ता लॉन्स येथे श्रीमद् भागवत कथेच्या धर्मसभेत प्रमुख संत महतांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संजय आहेर यांनी दिली आहे. सदर पुरस्काराची घोषणा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री. परमपूज्य आचार्य प्रवर विद्वा़श बाबा  शास्त्री  यांनी केली आहे.
.     आमदार सुहास कांदे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून विविध क्षेत्रात कार्य करताना सर्वच धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न तडीस लावण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात सर्व धर्मातील अनेक धार्मिक स्थळांचा कायापालट झाला असून तिथे अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. मोठा निधी आणून गाव खेड्याचा विकास केला आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत शासकीय योजना पोहोचवत असताना त्यांनी आरोग्य शिबीर, फिरते दवाखाने, मोफत रेशन कार्ड वाटप, मोफत चष्म्याचे वाटप यांसारखी कामे केली आहेत. गरीब व गरजू रुग्णांना मोफत ऑपरेशन करून दिली आहेत. अनेक महापुरुषांची स्मारके उभारण्याचे काम केले आहे.
.    आ. सुहास कांदे यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक धर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले आदर्श मानून सर्वसामान्य रयतेच्या कल्याणासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मतदार संघातील ८० टक्के गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला आहे. त्यामुळे सर्व धर्मांचे रक्षक म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावरील असा सन्मान मिळवणारे ते महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहे.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक