येणाऱ्या पिढीचा भविष्यकाळ सुखद व्हावा म्हणून 'तो ' प्राणपणाने झटतोय.! - सौ.अंजुम कांदे

सा. श नै श्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव  (नाशिक ) संतोष कांदे 
आपण जे भोग भोगलेय, ते येणाऱ्या पिढीला भोगावे लागू नयेत म्हणून आमदार सुहास कांदे अथक प्रयत्न करताहेत. आजपर्यंत ज्या वंचित दलित, आदिवासी किंवा छोट्या जाती समूहाला मूलभूत सुविधा ही उपलब्ध करून दिल्यानाहीत. त्यांना प्रथम प्राधान्य देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपले आमदार करत आहेत. असे प्रतिपादन समाजसेविका सौ. अंजुम सुहास कांदे यांनी केले.
.    आज वीर एकलव्य जयंती व आदिवासी दिनानिमित्ताने मतदार संघातील नांदगाव शहर, न्यू. पांझन, जामदरी, पळाशी, बेजगाव, नागापूर, खादगाव, झाडी, जळगाव (चोंढी ) येथील वीर एकलव्य पुतळा प्राणप्रतिष्ठा व सभामंडप लोकार्पण सोहळे सौ. अंजुम कांदे यांचे हस्ते पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
.    सौ. कांदे पुढे म्हणाल्या की,गेल्या पन्नास वर्षात ज्यांनी या वंचित समाजाकडे दुर्लक्ष केले.ते सतत बकफूटवर कसे राहतील याचीच तजवीज केली.अशा समाजाला आमदार सुहास अण्णांनी केंद्रस्थानी ठेवून विकासाची रूपरेषा आखली. प्रथम या समाजाला कशाची प्रथम गरज आहे,त्याचा अभ्यास करून ती पूर्तता केली. मग शिधापत्रिका असो वा जातींचे दाखले घरपोहोंच नेवून देण्याची व्यवस्था उभी केली. त्यानंतर मग विविध धार्मिक, सामाजिक कार्यासाठी मतदार संघातील प्रत्येक वाड्या, वस्त्यांवर सभामंडप बांधून दिले. मग प्रत्येक गल्ली -बोळात पक्के रस्ते दिलेत. या रस्त्यावरचा अंधार घालवण्यासाठी हायमास्ट दिलेत. मग सामाजिक अस्मिता जोपसण्यासाठी थोर महापुरुषांचे पुतळे उभारून दिले. आणि विशेष म्हणजे हे सर्व अवघ्या दोन वर्षात साध्य केले. कारण कोरोना काळाचे दोन वर्ष, सरकार स्थापनेचे सात आठ महिने असेच वाया गेले. असेही त्या शेवटी म्हणाल्या.
.    यावेळी वरील सर्व कार्यक्रमात किरण कांदे, धनंजय कांदे, महेंद्र दुकळे, राजेंद्र पवार, किशोर लहाने, संगीता बागुल, विद्या जगताप, रोहिणी मोरे, सुनीता महाले, रमेश काकळीज, भावराव बागुल, बापू जाधव, मनीषा लहाने, रंजना सानप, ऍड. किरण गायकवाड,अँड. विद्या कसबे, बाबासाहेब मोरे, नींबा मोरे, सौ. पुष्पा घुगे, सोमनाथ घुगे, संगीता वडक्ते, सुनंदा सांगळे, शशिकला पवार, आशा वडक्ते, मनीषा सोनावणे, शांताराम सोनावणे, देविदास तोरे, वसंत मोरे,आदी सह विविध गावांतील लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक