शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिल्याच्या मुद्द्यावर सुहास अण्णांनी आवाज उठवावा - शेतकऱ्यांची मागणी

सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावर शासनाने मदत जाहीर करून तिचे वाटप ही केले. मात्र ही मदत अत्यंत तुटपुंजी होती. त्यावर हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुहास कांदे यांनी चर्चा घडवून आणावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
     शासनाने जाहीर केलेली मदत अन प्रत्यक्ष हातात पडलेली रक्कम यात जमीन अस्मान चे अंतर होते. दोन मका बियाणे पॅकेट घ्यायचे ठरले तर साडे चार हजार रुपये लागतात. मग असे असताना एक एकर पीक नुकसानीचे अवघे साडे तीन हजार रुपये हातात पडले.आणि विशेष म्हणजे कागदपत्रे करण्यासाठी तीनशे ते साडे तीनशे रुपये लागले होते. आणि हा प्रकार म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर असा असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून होत होती.
   दरम्यान नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. नांदगाव मतदार संघांचे आमदार सुहास कांदे यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांनी यापूर्वी अनेक प्रश्न सत्ताधारी असतानाही शासनाशी भांडून सभागृहात भक्कम बाजू मांडून मंजूर करून आणले आहेत. आता या तुटपुंजी मदत प्रकरणावर त्यांनी भाष्य करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या रकमेची रब्बी हंगामासाठी मदत होऊ शकेल.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक