मका खरेदी केंद्र उशिरा सुरु झाल्याने लाखो रुपयांचा फटका.! पुढील काळात लवकर पाठपुरावा करण्याचे आमदारांचे आश्वासन
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
राज्यात सध्या सुरु असलेल्या निवडणुकांमुळे मका आधारभूत किंमत खरेदीस उशीर झाला.त्यामुळे शेतकरी बांधवाना कमी भावामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागल्याची खंत व्यक्त करून पुढील काळात यासाठी लवकर पाठपुरावा केला जाईल. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मका आधारभूत किंमत खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार सुहास कांदे व माजी आमदार अँड. अनिल आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मनमाड व नांदगाव नगरपरिषद च्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.माजी आ. आहेरांच्या भाषणाचा धागा पकडून आमदार कांदे यांनी नांदगाव बाजार समितीत शिस्तबद्ध कामकाज होत असल्याचा गौरव केला मात्र मनमाड बाजार समितीमध्ये सुरु असलेल्या कामकाज शिस्त यावर मिश्किल टीका केली.
यावेळी सभापती दर्शन आहेर, विलास आहेर, तेज कवडे, यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर माजी आमदार अँड अनिल आहेर,नगराध्यक्ष बबलू पाटील (मनमाड ), सागर हिरे (नांदगाव ) बाजार समिती सभापती दर्शन आहेर,शनैश्वर खरेदी विक्री संघांचे चेयरमन विलास आहेर, माजी सभापती तेज कवडे,माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,संचालक अमित पाटील, उपसभापती अनिल सोनावणे, चेतन पाटील,रामनिवास कळंत्री, नंदू पाटील, बाळू शेवरे, दीपक पांडव, कल्पना जगताप, वाल्मिक टिळेकर, विद्या कसबे, गुलाब भाबड, स्वाती नावंदर, अमोल नावंदर,काशिनाथ देशमुख,दीपक मोरे, समाधान पाटील, राजाभाऊ जगताप, योगिता खरोटे, शोभा कासलीवाल, अनिल वाघ, स्नेहल पाटील, सईद शेख, किरण देवरे, निलेश इप्पर, भैय्या पगार, रुपाली पाटील, पृथ्वीराज पाटील, जुबेदाबी खान, काका सोळसे, पोपट सानप, क्रांती जाधव, सुनील जाधव , गायत्री शिंदे, आनंद कसलीवाल, काशिनाथ देशमुख, प्रकाश जाधव,राजभाऊ शिंदे, जगताप सर, महावीर जाधव, जीवन गरुड, शिवाजी पाटील, रमेश करवा,बाळासाहेब कवडे,लोकेश साबळे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव अमोल खैरनार, जितेंद्र गरुड, भाऊसाहेब आगवन, बाबासाहेब साठे, शरद आहेर, मच्छिन्द्र सूर्यवंशी, गणेश खान्देशी, दादाभाऊ खैरनार, बन्सी नगे,सचिन इप्पर, आदिनी कष्ट घेतले.
Comments
Post a Comment