आहेर +कवडे राजकीय कुरघोडी.. अन आमदारांची शिष्टाई.!
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
या तालुक्यात पूर्वापार चालत आलेला इतिहास असा आहे की, आहेर +कवडे एकत्र असले की तिसऱ्याची डाळ शिजत नाही, मात्र हे एकमेकांच्या विरोधात गेले की, हमखास तिसऱ्याचा उदय होतो. हे अनेकदा राजकीयदृष्ट्या खरे झाले आहे.
काल नांदगाव बाजार समितीत आधारभूत किंमत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ विद्यमान आ. सुहास कांदे, माजी आमदार अँड अनिल आहेर यांचे हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार आहेर यांची उपस्थिती लाभणार यास्तव जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी दांडी मारली असावी कदाचित....
या कार्यक्रमात बापूसाहेब कवडे यांचे चिरंजीव तथा या बाजार समितीचे माजी सभापती तेजदादा कवडे यांनी अनेक महत्वाच्या बाबी मांडताना मका नोंदणीचे अधिकार देण्यासाठी अजून काही संस्थांची आवश्यकता असल्याची बाब अधोरेखित केली.त्यासाठी त्यांनी बोलठाण., न्यायडोंगरी, तसेच नांदगाव बाजार समितीतच अनेक शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागत असल्याचे स्पष्ट केले.मात्र सध्या हे अधिकार माजी सभापती विलास आहेर यांच्या शनैश्वर तालुका खरेदी संघाकडे आहेत. आणि काही वर्षांपूर्वी तेज कवडे हे न्यायडोंगरी पंचायत समिती गणातून लढत असताना पराभूत झाल्याची घटना घडली होती.
आमदार कांदे यांनी मात्र कवडे यांचा रोष लक्षात घेऊन, दोघांत ताळमेळ साधण्यासाठी शनैश्वर खरेदी विक्री संघाने अजून दुसरा पर्याय शोधण्याचा सल्ला दिला. व गरज पडल्यास दुसऱ्या संस्थेची मदत घेऊ.! असे सांगितले.
अगदी बरोबर
ReplyDelete