ब्रेकिंग न्यूज....मुलाकडून जन्मदात्या बापाची निर्घृण हत्या.! घाटमाथा हादरला
ब्रेकिंग न्यूज....
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
नांदगाव तालुक्याच्या घाटमाथ्यावरील जातेगांव येथील वीस वर्षीय मुलाने किरकोळ भांडणातून आपल्या जन्मदात्या पित्याची डोक्यात लोखंडी पाईप घालून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली.या मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,जगन्नाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विठ्ठल गायकवाड (वय -५८ ) यांचे व त्यांचा मुलगा श्रीकृष्ण उर्फ सावता विठ्ठल गायकवाड ( वय -२० ) याने त्यांच्या शेतातील घरात रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास वडील झोपेत असताना डोक्यात व तोंडावर, ओठांवर लोखंडी पाईपने जोरदार प्रहार करून गंभीर जखमी केले. व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी अवघ्या काही तासात शोध घेऊन या आरोपी मुलास अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित करत आहेत.
Comments
Post a Comment