नांदगाव उपनगराध्यक्षपदी टिळेकर की,जगताप.?
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
गेल्या महिन्यात नांदगाव नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक होऊन तीत आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची (शिंदे गट ) एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सागर हिरे या कोरी पाटी असलेल्या तरुणाला आमदारांनी संधी देऊन शहराच्या प्रस्थापित राजकारणाला अभूतपूर्व अशी कलाटणी दिली आहे.
दोनच दिवसापूर्वी आमदार कांदे यांच्या सूचनेनुसार, गटनेता पदावर आमदारांचे मित्र तथा नांदगाव बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर यांच्या सुविद्य पत्नी बिनविरोध नगरसेविका सौ. स्वाती नावंदर यांची निवड करण्यात आली आहे. तर आता उपगराध्यक्ष निवडीची तारीख जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केली असून, तशा नोटीसा नवनिर्वाचित नगरसेवकांना नगराध्यक्ष सागर हिरे यांनी बजावल्या आहेत.
येत्या १३ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम राबवला जाणार आहे.
नगराध्यक्ष व संपूर्ण नगरसेवक एकाच पक्षाचे असल्याने ही निवडणूक म्हणजे एक कायदेशीर सोपस्कार असून, आमदार सुहास कांदे ठरवतील तोच उपगराध्यक्ष या पदावर विराजमान होणार यात काही शंका नाही. नगराध्यक्ष आणि गटनेता निवडीनंतर उपगराध्यक्ष पदावर आमदार कांदे कुणाला प्रथम संधी देतात याकडे शहराचे लक्ष लागले आहेच, मात्र नगरसेवक ही अपेक्षा लावून बसले आहेत.
या शहरात मराठा, माळी, बौद्ध, मुस्लिम, अन जैन अशी वर्गवारी आहे. त्या अनुषंगाने आमदार कांदे यांनी सामाजिक समतोल साधत असताना मराठा समाजाचे नगराध्यक्ष,माहेश्वरी समाजाचा गटनेता अशी निवड केली आहे. आता मुस्लिम, बौद्ध, अन माळी समाजाचा विचार होऊन, माळी समाजाचे वाल्मिक टिळेकर यांचा विचार होऊ शकेल कारण यापूर्वी ना. छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक म्हणून टिळेकर वावरले आहेत. पण काही महिन्यापूर्वी शहरातील अनेक माळी समाजाच्या नेत्यांनी भुजबळांची साथ सोडून आमदार कांदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.या ही कारणाचा विचार होऊ शकेल. त्यानंतर बौद्ध समाजाच्या तीन नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यात कल्पना जगताप, अँड. विद्या कसबे, अन राखी जाधव यांचा समावेश आहे. यात सौ. जगताप ह्या वयाने जेष्ठ आहेत. अन आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते जगताप सरांच्या त्या पत्नी आहेत. त्यामुळे या नावाचा प्रथम विचार होऊ शकतो. असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
Comments
Post a Comment