ब्रेकिंग न्यूज... जळगाव बुद्रुकला बिबट्याच्या हल्ल्यात दोन पाळीव जनावरे ठार..!

सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील भास्कर कांदे यांच्या शेतातील वस्तीवर बिबट्याने एक गाय ठार करून तिचा फडशा पाडला तर एक दोन वर्ष वयाचा गोऱ्हा ठार केल्याची घटना आज मध्यरात्री घडल्याने  पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे.
  भास्कर कांदे हे आपल्या गट नंबर १५१ मधील शेतावरच वास्तव्य करून असतात. त्यांच्याकडे शेतीपयोगी पाळीव जनावरे आहेत. आज मध्यरात्री घरातील सर्वजण झोपेत असताना बिबट्याने एका गायीला ठार केले. व तिचा पूर्ण फडशा पडल्यानंतर एक गोऱ्हा ही ठार केला. कांदे कुटुंबाला या घटनेची सकाळी उठल्यानंतर वाच्यता झाली.
   नांदगाव तालुका वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली  वनरक्षक श्री. वडगे, टेकणर, गंडे,मोरे आदी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. व पंचनामा केला. व उपस्थित शेतकऱ्यांना खबरदारीच्या सुचना केल्यात.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक