ब्रेकिंग न्यूज....या बिबट्याने आपला मोर्चा लगतच्या कासारीकडे वळवला..एका गायीचा फडशा पाडला.!
सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
दोन दिवसांपूर्वी जळगाव बुद्रुक येथील भास्कर कांदे यांच्या शेतातील वस्तीवर बिबट्याने एक गाय व एक गोऱ्हा मारून खाल्ल्याची घटना ताजी असतानाच, काल रात्री याच बिबट्याने लगतच्या कासारी गावाकडे मोर्चा वळवून तेथील संजय त्र्यंबक सानप यांच्या गायीचा फडशा पाडला.या सलग घडलेल्या घटनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कासारी येथील संजय सानप यांच्या शेतातल्या गोठ्यात त्यांची पाळीव जनावरे बांधून असतात. काल मध्यरात्री या बिबट्याने तेथे आपला मोर्चा वळवून गायीला ठार केले. व तिचे मांस भक्षण करून धूम ठोकली.
या घटनेची माहिती मिळताच कासारीचे सरपंच नितीन शेरेकर यांनी वन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर नांदगाव तालुका वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक श्री. वडगे, टेकणर, गंडे,मोरे आदी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. व पंचनामा केला. व उपस्थित शेतकऱ्यांना खबरदारीच्या सुचना केल्यात.
Comments
Post a Comment