देशाचा ७७ वा. प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
 जळगाव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहन नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा युवा नेते दिपक मोरे यांचे हस्ते तर ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन सरपंच विश्वनाथ (आमदार ) कांदे यांचे हस्ते करण्यात आले.
    क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या विद्यालयातील ध्वजारोहन सामाजिक कार्यकर्ते शरद गिते यांचे हस्ते करण्यात आले. सकाळी गावातून विद्यार्थी व शिक्षकांनी देशभक्तीपर घोषणा देत प्रभातफेरी काढली. ग्रामपंचायत कार्यालय, विद्यालय, व त्यानंतर प्राथमिक शाळेचे ध्वजारोहन करण्यात आले.प्राथमिक शाळेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असंख्य विद्यार्थ्यांनी अनेक गीतांच्या माध्यमातून आपले कलागुण दाखवले.
    या विद्यार्थ्यांचा उपस्थित पालक, प्रमुख पाहुणे, व ग्रामस्थ तरुणांनी  रोख स्वरूपात बक्षिसे देऊन हुरूप वाढवला.अत्यंत नेटके व देखणे नियोजन शाळेच्या शिक्षकांनी केले होते. त्यांचे ही कौतुक ग्रामस्थांनी व प्रमुख पाहुण्यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य,विद्यालय मुख्याध्यापक शिक्षक,प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षक ,अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, यांच्यासह पालक, ग्रामस्थ, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक