नांदगाव येथे जायंट्स फेडरेशन २-ब चा भव्य शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न..

सा. श नैश्वर टाइम्स वृत्तसेवा 
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे 
येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज कंपाऊंडमध्ये जायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव आणि जायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव सहेली (जायंट्स फेडरेशन २-ब) यांचा सन २०२६ चा भव्य 'शपथग्रहण समारोह' शनिवारी, ३१ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर  नंदकुमार घोडेले आणि माजी नगरसेविका अनिता घोडेले उपस्थित होते.यावेळी आमदार  सुहास कांदे,लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर  हिरे यांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्यात.
        या सोहळ्यात शपथ घेतलेल्यात जायंट्स ग्रुप (पुरुष) विजय बागरे (अध्यक्ष), सोमनाथ घोंगणे,  कमलेश किलोसिया, प्रसाद बुरकुल,संजय कलंत्री.यांच्यासह सहेली ग्रुप (महिला) संगिता बागरे (अध्यक्षा), श्रीमती सुनिता बाविस्कर, सौ. जयश्री पटेल, सौ. निवेदिता बुरकुल आणि सौ. पुष्पा दुसाणे यांचा समावेश आहे.
       कार्यक्रमाला फेडरेशन २-ब चे नूतन अध्यक्ष जुगलकिशोर हरकुट आणि नूतन सचिव सन्मती जैन,एन.सी.एफ. सदस्य श्री. विनोद शेवतेकर,जगन्नाथ साळुंके,लहुजी पाटील,रत्नाकर महाजन, नरेश गुप्ता उपस्थित होते. 
     शपथविधी अधिकारी म्हणून सुमित गुप्ता यांनी काम पाहिले.तर सूत्रसंचालन प्रसाद बुरकूल,दत्तराज छाजेड यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मावळते अध्यक्ष सोमनाथ दुसाणे, सौ.वैशाली दुसाणे यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जायंट्स परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक